पिंपरी चिंचवडमध्ये चार महिन्यात २७६ कोयते जप्त

पिंपरी चिंचवडमध्ये मागील चार महिन्यात एकूण ५९ शस्त्रे व २७६ कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच १३५ कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 5 May 2023
  • 06:13 pm
पिंपरी चिंचवडमध्ये चार महिन्यात २७६ कोयते जप्त

पिंपरी चिंचवडमध्ये चार महिन्यात २७६ कोयते जप्त

ट्वीटरवरून आयुक्तांनी नागरिकांच्या प्रश्नाला दिले उत्तर

पिंपरी चिंचवडमध्ये मागील चार महिन्यात एकूण ५९ शस्त्रे व २७६ कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच १३५ कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.

आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरीकांना दुपारी ४ ते ५ यावेळेत त्यांचे प्रश्न ट्वीटरवरून #Ask_CP_PCCity या हॅशटॅग द्वारे विचारण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवडमधील अनेक नागरीकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या.

या तक्रारींना उत्तर देताना आयुक्त चौबे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात रात्री १० नंतर बुलेट बाईकचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये ३५० हून अधिक बुलेट बाईकचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावण्यांच्या नंबर प्लेट काढून जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत.

पुढे माहिती देताना चौबे म्हणाले की, आता पर्यंत चुकीच्या बाजूने वाहन चालविण्या ३ हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुढेही कारवाई चालू राहिल. त्याचबरोबर मागील चार महिन्यात एकूण ५९ शस्त्रे व २७६ कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच १३५ कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest