Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, पाच जण जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर सोनवडी फाट्याजवळ शनिवारी पहाटे चारच्या सुमारा टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 22 Apr 2023
  • 01:43 pm
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, पाच जण जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, पाच जण जखमी

टेम्पोला ट्रकने पाठीमागून दिली धडक

पुणे-सोलापूर महामार्गावर सोनवडी फाट्याजवळ शनिवारी पहाटे चारच्या सुमारा टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका टेम्पो ट्रकमधून सुमारे आठ जणांचा गट जवळच्या गावात एका कार्यक्रमासाठी जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने टेम्पोला जोरात धडक दिली. यात पाच जण जखमी झालेत.

या अपघाताची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story