३ अपत्य असलेल्या आमदार, खासदारांना अपात्र करा
तीन अपत्य असलेल्या आमदार आणि खासदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात प्रथम स्थानावर पोहोचला आहे. चीनला मागे टाकून भारताची लोकसंख्या १४२ कोटींवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, “देशाची वाढती लोकसंख्या हा आता चिंतेचा विषय झाला आहे. आपण सर्वांनी हे गांभीर्याने घेतले पाहिजे, मुले हे देवाचे आशीर्वाद आहेत असे कोणत्याही धर्माने मानू नये. हा देवाचा आशीर्वाद कसा असू शकतो?”
अजित पवार पुढे म्हणाले की, पहिल्या प्रसूतीनंतर एखाद्या जोडप्याला एक मूल झाले आणि त्यानंतर दुसऱ्या प्रसूतीदरम्यान महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला तर पालकांना दोष देता येणार नाही. मात्र, यापूर्वी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तीन अपत्ये असलेल्या आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवायचे. खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार केंद्राकडे आहे, त्यामुळे केंद्राने आपल्या अधिकारांचा वापर करावा, असेही अजित पवार यांनी म्हणाले.