जुनी सांगवीत दहशतीसाठी हवेत गोळीबार, दोघांना अटक
जुनी सांगवी येथे आपले वर्चस्व रहावे म्हणून दहशत निर्माण करण्यासाठी दोघांनी हवेत गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत.
सुजल राजेंद्र गिल (वय १८, रा. विनायक नगर, नवी सांगवी) आणि रिहान आरिफ शेख (वय १९, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रविवारी (दि. १६) साडेअकराच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात हवेत गोळीबार केला. जुनी सांगवी परिसरात लोकांना दमदाटी करू दहशत निर्माण केली. त्यानंतरसांगवी पोलिसांनी जुनी सांगवी येथील विसर्जन घाटाजवळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.