Gold rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव कडाडले

गेल्या वर्षी डिसेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. याचा परिणाम देशभरासह पुण्यातील सोन्याच्या किमतीवरही झाला आहे. अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 21 Apr 2023
  • 12:37 pm
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव कडाडले

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव कडाडले

सोन्याच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ

गेल्या वर्षी डिसेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. याचा परिणाम देशभरासह पुण्यातील सोन्याच्या किमतीवरही झाला आहे. अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

पुण्यात सध्या १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ५६ हजार ०५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याच भाव ६१ हजार १५० रुपये आहे. गुरूवारच्या तुलनेत आज पुण्यातील सोन्याच्या भावात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे.

पुणेकरांसह देशभरातील नागरिक अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा प्लॅन आखतात. मात्र, आता अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधिच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच उद्या म्हणजेच शनिवारी सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story