तुकोबारायांच्या पालखी मार्गावर फुलली हिरवळ
दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. यामध्ये सुमारे १०२५ वटवृक्ष लावण्यात आले होते. यातील ८७५ वटवृक्ष म्हणजेच ८५ टक्के झाडे जगली आहेत. या बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०२२ मध्ये सुरू झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. पालखी मार्गाच्या कामाबरोबरच वृक्षारोपणाचे काम देखील हाती घेण्यात आले होते.
In February and March 2022, we conducted a transplantation project along the Sant Tukaram Maharaj Palkhi Marg, Maharashtra located on the Baramati-Indapur section of NH 965G. During this project, we successfully transplanted 1,025 Banyan trees to the edge of the Right of Way… pic.twitter.com/ReVGoZpFL2
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 2, 2023
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ९६५G च्या बारामती, इंदापूर क्षेत्रात मोडणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आपण फेब्रुवारी आणि मार्च २०२२ मध्ये वृक्षारोपण प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पा अंतर्गत आपण १०२५ वटवृक्ष या महामार्गाच्या कडेने लावले होते. या रोपण केलेल्या वृक्षांपैकी ८७० वृक्ष म्हणजेच ८५ टक्के झाडे सुरक्षित आणि जीवित आहेत.”