Firing in the air : व्यावसायिकाला लुटण्याचा डाव फसला, चोरट्यांचा हवेत गोळीबार

पुणे शहरातील नऱ्हे येथे जबरी चोरीच्या उद्देशाने टोळक्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 24 Apr 2023
  • 10:35 am

व्यावसायिकाला लुटण्याचा डाव फसला, चोरट्यांचा हवेत गोळीबार

दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे शहरातील नऱ्हे येथे जबरी चोरीच्या उद्देशाने टोळक्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम इंगळे यांचे नऱ्हे येथे हिरो बाईक शॉप आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास तुकाराम हे दिवसभराचा झालेल्या व्यवहाराची कॅश रक्कम घेऊन दुकानासमोर  त्यांच्या गाडीकडे येत होते.

यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी गाडीवर येत त्यांच्या हातातील रक्कम जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांचा डाव यशस्वी न झाल्यामुळे पडकले जाण्याच्या भितीने चोरट्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरून चोरट्यांनी पळ काढला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story