आदर पूनावाला
केंद्राची सध्या आम्हाला कोरोना लसीची मागणी नाही. मात्र, आम्ही ६ मिलियनहून अधिक लसीचा अतिरिक्त साठा तयार करून ठेवला आहे, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली.
अदर पूनावाला एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पूनावाला म्हणाले की, यूएस आणि युरोपमध्ये आपल्याकडील एकाच लसीला मान्यता आहे. परंतु, तिचीही मागणी सध्या खूप कमी आहे. सध्या केंद्राची आमच्याकडे कोणतीही मागणी नाही. परंतू, आम्ही ६ मिलियनहून अधिक कोरोना लसीचा साठा तयार करून ठेवला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्याकडे लहान मुलांसाठी आवश्यक असलेली कोव्हक्स लस तयार देखील तयार आहे. या लसीतून मिळणारा पैसे देखील आम्ही लस बनवण्यासाठी पुढे वापरत, असेही ते यावेळी म्हणाले.