Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, १० जण जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. मात्र यातील ४ चार जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. सध्या जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 25 Apr 2023
  • 09:58 am
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

१० पैकी ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. मात्र यातील ४ चार जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. सध्या जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऑरेंज या खाजगी‌ कंपनीची प्रवासी बस मुंबईवरून निजामाबादच्या दिशेने जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील भांडगाव येथे अचानक एक दुचाकी समोर आली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

हा अपघात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. अपघातात सुमारे १० प्रवासी जखमी झाले. त्यांना तत्काळ पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, १० पैकी ४ प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story