भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, खडकवासला चौपाटीजवळील घटना

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला धरण चौपाटी परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 6 May 2023
  • 03:00 pm
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident

दुचाकीवरील दुसरा प्रवासी तरुण गंभीर जखमी

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला धरण चौपाटी परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

नितीन भाऊसाहेब मुसमाडे (वय ३२, रा. नऱ्हे ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर राम गणपत राठोड (वय २७, रा. प्रतापगड हॉस्टेल, नऱ्हे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन आणि राम दुचाकीवरून पहाटे अडीचच्या सुमारास डोणजे परिसरातून पुण्याकडे निघाले होते. यावेळी खडकवासला धरण चौपाटी परिसरात आले असता भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नितीनचा जागीच मृत्यू झाला आहे. तर राम गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, कार चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest