Income tax : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड

पुण्यातील औंध आणि पिंपरी परिसरात आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर आणि घरावर धाड टाकण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 4 May 2023
  • 10:38 am
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड

औंध परिसरातील सिंध सोसायटीसह तीन ठिकाणी छापेमारी

पुण्यातील औंध आणि पिंपरी परिसरात आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर आणि घरावर धाड टाकण्यात आली आहे.

पुण्यातील पिंपरी आणि औंध परिसरात असणाऱ्या सिंध सोसायटीत आज सकाळपासून आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. याशिवाय इतर तीन ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. तीन बांधकाम व्यवसायिकांवर ही छापेमारीची कारवाई झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक अनियमितते गैरव्यवहार झाल्यामुळे कारवाई करण्यात येत आहे. या व्यावसायिकांच्या कागदपत्राची चौकशी देखील सुरू झाली त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत.

मात्र, छापेमारी करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावे अद्यापही समोर आलेली नाहीत. त्यामुळे आता छापेमारीत किती रक्कम समोर येते? बांधकाम व्यावसायिंकामध्ये कोण आयकर विभागाच्या गळाला लागतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest