रेल्वे स्टेशन परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्राहकांना आमिष दाखवून मुलींशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ग्राहकाच्या रुपात एका पोलिस कर्मचाऱ्याला पाठवले. त्यानंतर कर्मचारी या जाळ्यात अडकताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
तसेच पोलिसांनी कारवाईदरम्यान ४ मुलींना ताब्यात घेतले आहे. या मुलींची सुटका करून त्यांना महंमदवाडी येथील पुनर्वसन केंद्रात नेण्यात आले. तर आरोपींविरोधात कलम ३७०, ३४ आणि अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्याच्या (पीआयटीए) कलमांनुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.