Gas cylinder : स्वारगेट बसस्थानक परिसरातील हातगाडीवरील गॅस सिलेंडर पेटला

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका हातगाडीवर असणाऱ्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. अचानक गॅस सिलेंडर पेटल्याने अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमनलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 28 Apr 2023
  • 10:37 am

स्वारगेट बसस्थानक परिसरातील हातगाडीवरील गॅस सिलेंडर पेटला

अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटात आगीवर मिळवले नियंत्रण

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका हातगाडीवर असणाऱ्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. अचानक गॅस सिलेंडर पेटल्याने अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमनलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट बस स्थानकाबाहेर असणाऱ्या हातगाड्या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. यातील एका हातगाडीवरील गॅस सिलेंडरने शुक्रवारी रात्री लिक झाल्यामुळे अचानक पेट घेतला. सिलेंडर पेटताच अग्निशमक दलाला याबाबत माहिती देण्यात आली.

त्यानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही मिनिटातच ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story