Sandalwood : शाळेच्या आवारातून चंदनाची चोरी, टोळक्यांचा सुरक्षा रक्षकावर हल्ला

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बंडगार्डन रस्ता परिसरातील एका शाळेतून टोळक्यांनी चंदनाच्या झाडांची चोरी केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 27 Apr 2023
  • 05:28 pm
शाळेच्या आवारातून चंदनाची चोरी

शाळेच्या आवारातून चंदनाची चोरी

शाळेच्या प्रवेशद्वारावरील कॅमेऱ्याची काचही फोडली

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बंडगार्डन रस्ता परिसरातील एका शाळेतून टोळक्यांनी चंदनाच्या झाडांची चोरी केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील अंजुम इस्लाम अहमद पीरमोहम्मद शाळेच्या आवारात चार चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर येथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला चाकून धाक दाखवून गप्प राहाण्यास सांगितले. गप्प बसले नाही तर जीवे मारू अशी धमकीही चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला दिली.

त्यानंतर चोरट्यांनी शाळेच्या परिसरातील चार चंदनाची झाडे तोडून पळ काढला. या झाडांची किमत सुमारे १० हजार रुपये होती. एवढेच नाही तर शाळेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर दगडफेक केली. त्यामुळे कॅमेऱ्याची काच देखील फुटली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चारही चोरट्यांचा शोध घेत आहेत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story