बँक ऑफ महाराष्ट्रला मागील तिमाहीत ८४० कोटी रुपयांचा नफा
बँक ऑफ महाराष्ट्रला मागील तिमाहीत ८४० कोटी रुपयांचा नफा झाला, अशी माहिती बँकेचे एक्झिक्युटिव्ह आशिष पांडे यांनी आज दिली. महाराष्ट्र बँकेने गेल्या वर्षभरात केलेल्या व्यवहाराचा लेखाजोखा आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस राजीव देखील उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्रचा ३१ मार्च २०२३ रोजी संपलेला तिमाही निकाल घोषित करण्यात आला आहे. याबाबत आशिष पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बँकेला मागील तीमाहीत ८४० कोटी रुपयांचा नफा झाला. तर बँकेचा पुर्ण व्यवहार २१.२३ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच ४,०९,२०२ कोटींवर गेला आहे.
तसेच बँकेच्या व्यवसायात २१.२३ % वृद्धी झाली असून ठेवीमध्ये १५.७१℅ वाढ झाली आहे. यामुळे एकूण ठेवी २३४०८३ कोटी झाल्या आहेत. याशिवाय, एकूण कर्जवाटपात २९.४९℅ वृद्धी झाली असून एकूण कर्जवाटप १७५१२० कोटी रुपये झाले आहे. मात्र, एकूण NPA ( अनुत्पादित मालमत्ता) मध्ये २.४७% घट झाली असून निव्वळ NPA ( अनुत्पादित मालमत्ता) मध्ये ०.२५% घट झाली आहे. तर निव्वळ नफ्यामध्ये १३६.४८% वाढ झाली असून बँकेला ८४० कोटींचा नफा झाला आहे.