अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल ?
पुण्यातील कालवा समितीची सर्किट हाऊस येथे आज साडेअकराच्या सुमारास बैठक होती. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे दोघेही उपस्थित राहणार होते. मात्र, अजित पवार अद्यापही सर्कीट हाऊसला पोहोचले नाहीत. त्यामुळे अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल झाले का? असा सवाल उपस्थित होत आहे.
आज साडेअकराच्या सुमारास अजित पवार यांची कालवा समितीची सर्किट हाऊस येथे बैठक होती. बैठक सुरू होण्यापूर्वी चंद्रकांत पाटील हे सर्किट हाऊस येथे पोहोचले. मात्र, अजितदादा आले नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केला आहे.
गेल्या काही दिवासांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या दरम्यान, अजित पवारांचे पुण्यातील काही कार्यक्रम रद्दही करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार यांचे पुण्यातील दौरे रद्द करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यातील अजित पवारांचा हा दुसरा दौरा रद्द झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार नेमके कुठे गेले? कार्यक्रमला आज का उपस्थित राहिले नाहीत? अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल झाले का ? असे प्रश्न आता राज्याच्या राजकारणात उपस्थित होत आहेत.