पीएमपीएमएल ६ मार्गांवरील बसेसच्या फेऱ्या कमी करणार !

सुरू झालेल्या बससेवेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने पीएमपीएमएलचे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ६ मार्गावरील पीएमपीएमएल बसच्या फेऱ्या कमी केल्या जाणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 8 May 2023
  • 02:44 pm
PMPML : पीएमपीएमएल ६ मार्गांवरील बसेसच्या फेऱ्या कमी करणार !

PMPML

ग्रामीण भागातील अल्पप्रतिसादामुळे पीएमपीएमएल तोट्यात

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पीएमपीएमएलने नव्याने सुरू केल्या आहेत. मात्र, नव्याने सुरू झालेल्या बससेवेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने पीएमपीएमएलचे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ६ मार्गावरील पीएमपीएमएल बसच्या फेऱ्या कमी केल्या जाणार आहेत.

कोरोना काळात राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस बंद असताना ग्रामीण भागातील मार्गांवरील पीएपी बस सेवांना चांगला प्रतिसाद मिळत होता. ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थी देखील या बसेसमधून दैनंदिन प्रवास करत होते. दैनंदिन प्रवाशांसाठी या मार्गावर दैनंदिन किंवा मासिक पास सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र, आता कात्रज बस डेपो ते सारोळा, सासवड मार्गे बोपदेवनगर, रहाटवडे, केतकवळे, विंझर, वांगणीवाडी या सहा मार्गांवर धावणाऱ्या बससेवा तोट्यात आहे. परंतू, पीएमपीएमएलकडून या मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार नसून काही फेऱ्या कमी केल्या जाणार आहे. दरम्यान, बसेसना मोठ्या आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असतानाही या मार्गांवर अधिक बससेवा सुरू करण्याची मागणी सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest