Accident : भरधाव दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळली, तरुणाचा मृत्यू

भरधाव दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यातील मुंढवा ते मगरपट्टा यादरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 21 Apr 2023
  • 10:58 am
भरधाव दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळली, तरुणाचा मृत्यू

भरधाव दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळली, तरुणाचा मृत्यू

भरधाव दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यातील मुंढवा ते मगरपट्टा यादरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला.

जोशी रमेश थोरात (वय २१, रा. कॅम्प) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगात मुंढवा येथून मगरपट्टाच्या दिशेने जात होता. या दरम्यान, दुचाकी स्पीड ब्रेकवर आदळली आणि तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे दुचाकी समोरील पत्र्याच्या शेडला धडकली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पोलीस आकस्मित मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story