पुण्यातील फुटपाथवर रंगल्या कुस्त्या, ब्रिजभूषण सिंह यांचा केला निषेध

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या समोर प्रतिकात्मक कुस्ती खेळून हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 4 May 2023
  • 03:24 pm
 पुण्यातील फुटपाथवर रंगल्या कुस्त्या

पुण्यातील फुटपाथवर रंगल्या कुस्त्या

जंतरमंतरवरील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठींबा

भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आदोलन सुरू आहे. ब्रिजभूषण सिंह अध्यक्ष असणाऱ्या कुस्ती संस्थेत महिलांवर अत्याचार होत आहेत, असा आरोप करत कुस्तीपटूंनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील फुटपाथवर प्रतिकात्मक कुस्त्या खेळण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या समोर प्रतिकात्मक कुस्ती खेळून हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्या.

याबाबत बोलताना संजय बालगुडे म्हणाले की, भारतातील कुस्तीपटूंनी देशाच्या आणि जगाच्या इतिहासात नाव कमावले आहे. मात्र, त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. त्यामुळे कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज प्रतिकात्मक कुस्ती खेळून निषेध नोंदवला आहे. आमचा संपुर्ण पाठिंबा कुस्तीपटूंना आहे. तसेच महिलेवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांचा आम्ही संपूर्ण पुणे जिल्ह्यातून निषेध नोंदवतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest