पावसाळ्यापुर्वी पुण्यातील अनाधिकृत होर्डिग काढा
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिग आहे. यंदाचा पावसाळा लवकरच सुरू होईल. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी लवकरात लवकर शहरातील अनाधिकृत होर्डिग काढून टाकावे, अशी मागणी पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय अगरवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनेक होर्डिंगसाठी संबंधित मालकांकडे कोणताही शासकीय कोणतीही परवाना नाही. तरीही बेधडक हुकूमशाही चालू आहे. प्रशासन आणि होर्डिंग मालक यांचे साठा लोटे आहे हे दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यात सुमारे ५ हजारच्या आसपास अनाधिकृत होर्डिंग आहेत. त्यातच यंदाचा पावसाळा लवकरच सुरू होईल. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी अनधिकृत होर्डिंग लवकरात लवकर काढण्यात याव्यात. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सर्व होर्डिंगचे ऑडिट होणे गरजेचे आहे, ज्या होर्डिंग अधिकृत आहे, त्या होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करावे, असेही अगरवाल यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे.