पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव काळेवाडी नंबर दोनजवळ रात्री उशीरा घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 3 May 2023
  • 04:18 pm
वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने दिली धडक

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव काळेवाडी नंबर दोनजवळ रात्री उशीरा घडली.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पळसदेव-काळेवाडी नंबर दोन येथे रात्रीच्या वेळी बिबट्या अचानक रस्त्यावर आला. रस्त्यावर अचानक बिबट्या आल्यानंतर वेगात असणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. बिबट्याला धडक बसल्यानंतर काही काळ तो जखमी अवस्थेत पडून राहिला. त्यानंतर ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

त्यानंतर फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्य व वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बिबट्या गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest