मद्यधूंद अवस्थेत तलवार उगारून दहशत
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्याच्या नशेत भर रस्त्यात तलवार उगारुन दहशत माजविणाऱ्या प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जाधव हा पोलीस कर्मचारी मुंढवा वाहतूक शाखेत कार्यरत होता. मद्यधूंद अवस्थेत असताना करण जाधवने धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत माजवली.
त्यानंतर पोलीसांनी त्याच्या विरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच जाधव याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याने त्याला निलंबित करण्याचे आदेशही पोलीस उपायु्क्त विजयकुमार मगर यांनी दिले. पुढील तपास पोलीस करत आहेत.