क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू
पुणे शहरातील वानवडी परिसरात क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
वेदांत शिवाजी धामणगावकर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हा मुलगा आठवीच्या वर्गात शिकत असून तो वानवडी परिसरात राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत त्याच्या मित्रासोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना बोलावून वेदांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ड़ॉक्टरांनी वेदांतला मृत्यू घोषीत केले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण हृदयक्रिया बंद पडल्याचे स्पष्ट झाले आहे.