वाकडमधील एमएनजीएल लाइन फुटली, पिंपरी चिंचवडकरांचा गॅस पुरवठा खंडीत
पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचे खोदकाम चालू असताना एमएनजीएल लाइन फुटली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होती आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधील अनेक सोसायट्यांचा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
वाकड येथील दत्त मंदिर येथील उत्कर्ष चौक येथे रस्त्याचे काम सुरू आहे. या खोदकामदरम्यान एमएनजीएल लाइन फुटली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील तब्बल दीडशे ते दोनशे सोसायट्यांचा गॅस पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच खोदकामाच्या जागी मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होत आहे.
यामुळे सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. वाकडमधील दत्त मंदिर रस्त्याचे काम चालू असताना एमएनजीएलची पाइपलाईन महापालिकेचा कंट्रॅक्टर कसा काय तोडू शकतो? यासाठी पालिकेतील कोणते अधिकारी आणि कंट्रॅक्टर यांना पालिका जवाबदार धरून कारवाई करणार का? किमान २५० ते ३०० सोसायट्यांमधील ३००० घरातील नागरिकांना त्रास झाला आहे, अशा शब्दात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.