पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदोरेंची ठाकरे गटातून हकालपट्टी
पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदोरे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे चांदोरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
बाळासाहेब चांदोरे यांच्यावर कारवाई केल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे. यावर ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांची सही आहे.
या प्रसिद्धी पत्रकामध्ये पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे म्हटले आहे.