History of pune : पुण्यातील इतिहासपुरुषांच्या इतिहासवास्तू इतिहासजमा
पुण्यात सध्या पुनर्विकास हा परवलीचा शब्द झाला आहे. जिकडे बघावे तिकडे पुनर्विकासाच्या नावाखाली जुन्या इमारती पाडून वाट्टेल ते करण्याचा उद्योग जोरात सुरू असल्याचे दिसते. या सर्व उन्मादी वातावरणात, पुण्याला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक यांसह विविध क्षेत्रांतील महापुरुषांच्या स्मृतींनादेखील नख लावण्याचे काम सुरू आहे.