रणसंग्राम २०२४: आत्याच्या विरोधात भाचा मैदानात!

बारामतीत लोकसभेवेळी शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी चुरशीचा संघर्ष होणार असून निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांनी थेट आत्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे

baramati loksabha 2024

संग्रहित छायाचित्र

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जय पवार सक्रिय, आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार

यशपाल सोनकांबळे 

बारामतीत लोकसभेवेळी शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी चुरशीचा संघर्ष होणार असून निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांनी थेट आत्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उद्या (गुरूवारी २९ फेब्रुवारी) ते सकाळी शुभारंभ लॉन्स येथे राष्ट्रवादीच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. (Baramati Lok Sabha 2024)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आपल्याला एकाकी पाडले जात असल्याचा आरोप केला होता. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना पाठबळ देण्याचे संकेत दिले.युगेंद्र पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी योगेंद्र पवार यांनी पवार साहेबांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचे सांगितले होते. युगेंद्र पवार म्हणाले, " परिवारात ज्याची पसंती असेल ते लोक त्यांचा प्रचार करतील. जसं दादांनी भाषणात सांगितलं की कदाचित परिवारातील बाकीचे काही लोक माझा प्रचार करणार नाहीत. तसं आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही. त्यांना ज्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना करू द्या. आपण आपला प्रचार करू"

जय पवार बारामतीत सक्रीय झाले. त्यांनी कुटुंबाला एकटे पाडल्यासारखे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. एवढेच नव्हे, तर बारामतीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. तसेच पक्षफुटीचा कुठलाही परिणाम जाणवत नसल्याचे म्हटले. राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अजित पवार आक्रमक पवित्रा घेऊन थेट शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यांचे बारामतीसह पुणे शहरातील कार्यक्रम वाढले असून, सातत्याने कुठे ना कुठे बैठका, सभा घेऊन हल्लाबोल सुरू आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे जुने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीवर भर देऊन पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील दोन्ही गट आता चांगलेच कामाला लागल्याचे दिसत आहे. अजित पवार आक्रमक झालेले असताना शरद पवार गट मात्र, संयमाने कामाला लागला आहे. अजित पवार यांनी अद्याप उमेदवार कोण असणार, हे स्पष्ट केलेले नाही. सध्या तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी जाहीर प्रचाराला सुरूवात केली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबतच छोटे चिरंजीव जय पवारही आता सर्व तालुक्यात सक्रिय झाले आहेत. जय पवार यांनी राष्ट्रवादी भवनला भेट देऊन सोशल मीडियाच्या टीमची नेमणूक केली. गुरूवारी ते पुणे दौऱ्यावर विविध कार्यक्रमासाठी येणार आहेत.

 लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. रॅली, पदयात्रा, भेटीगाठी, बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी जय पवार सतत येतील, अशी महिती सुत्रांनी दिली आहे.

पवार कुटुंबियातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाल्यामुळे राजकारणाला वेगळाच रंग प्राप्त झाला आहे. एकीकडे भाजपा घराणेशाहीच्या विरोधात राजकारणाची भाषा बोलत आहेत. दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या माध्यमातून  पवारांची तिसरी पिढी मैदानात आल्यामुळे गोची निर्माण झाली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest