Pune : पुण्यातील सारथीची सयाजीराव गायकवाड गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना !

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही.

Pune : पुण्यातील सारथीची सयाजीराव गायकवाड गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना !

पुण्यातील सारथीची सयाजीराव गायकवाड गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना !

पुणे : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही.

यासाठी राज्य शासनाने आता पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यू वर्ल्ड रँकिंगमध्ये 200 च्या आत रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेणाऱ्या मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे 75 विद्यार्थ्यांसाठी सन 2023 -2024 पासून छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेमार्फत 'सयाजीराव गायकवाड- सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना' राबविण्यास मान्यता दिली आहे.

यामध्ये अभियांत्रिकी पदवी, पदविकेसाठी-20 तर पीएचडीसाठी- 5, वास्तुकलाशास्त्र पदवी, पदविकासाठी-4, पीएचडीसाठी 2, व्यवस्थापन पदवी, पदविकेसाठी-2, पीएचडीसाठी-1, विज्ञान पदवी, पदविकासाठी-10 पीएचडीसाठी- 5, वाणिज्य/अर्थशास्त्र पदवी, पदविकासाठी -4, पीएचडीसाठी -5, कला पदवी, पदविकासाठी -4, पीएचडीसाठी -5, विधी अभ्यासक्रम पदवी, पदविकासाठी -4, पीएचडीसाठी- 1 तसेच औषध निर्माण शास्त्र पदवी, पदविकासाठी -2 तर पीएचडीसाठी -1 असे 50 पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी तर 25 पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षासाठी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्याची ही योजना आहे.

अटी व शर्ती :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना परदेशातील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये 200 च्या आत रॅकींग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.

विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र सरकारची परदेशी शिष्यवृती घेतलेली नसावी. लाभार्थ्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा. परदेशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असणे आवश्यक आहे. एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी व योजनेसाठी पात्र असणार नाही. प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना नमूद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थींना 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 वर्ष वयोमर्यादा असावी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे, कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक वर्षांतील वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.

विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉम नंबर 16 व सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षांचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 75 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest