पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही !
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (Pune District Central Bank) संचालक पदासाठीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा आणि पार्थ पवार (Parth Pawar) उमेदवारी अर्ज भरणार नाही हे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज यादीमध्ये त्यांचे नाव नसल्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घरातील व्यक्ती बँकेच्या संचालक मंडळावर नसणार आहेत. त्याऐवजी पवारांचे निष्ठावंत व ज्येष्ट कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकपदाची आज पोटनिवडणूक होत आहे. अजित पवारांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेच्या बारामती तालुका 'अ' वर्ग मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घोषित केली होती. अजित पवार देतील तोच उमेदवार असणार आहे. अशी बँकेच्या संचालक मंडळाची भूमिका आहे. आता पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अजित पवारांकडून घराणेशाहीला शह देत पुन्हा पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारींना संधी देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं संचालक पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागेवर पार्थ किंवा सुनेत्रा पवार संचालक होणार असल्याची जोरदार चर्चा होती. बॅंकेचे संचालक होऊन जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ही तयारी असल्याचे बोलले जात होते. या सर्व राजकीय चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे. आज बॅंकेच्या संचालक पदासाठी निवडणुक होत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.