Earthquake : नेपाळ ते अफगाणिस्तानापर्यंत भूकंप, केवळ 36 तासांच्या आत दोनवेळा झाला भूकंप !
नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिसामोलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.6 असल्याचे सांगितले गेले आहे. तथापि, नेपाळमधील (Nepal) भूकंपाचा परिणाम भारतात जाणवला.
अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये रात्री उशिरा भूकंपाचा जोरदार हादरा जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिसामोलॉजीने म्हटले आहे की अफगाणिस्तानात 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
नेपाळमध्ये सतत भूकंपाचे धक्के
शुक्रवारी उशिरा नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर 157 लोक मरण पावले आणि कमीत कमी 375 लोक जखमी झाले. आतापर्यंत शोध आणि बचावाचे काम चालू आहे. शुक्रवारी नेपाळच्या जजार्कोट जिल्ह्यात भूकंप झाल्यामुळे मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या महिन्यातही नेपाळमध्ये भूकंप हादरे अनेक वेळा जाणवल्या.