पुण्यात फटाका स्टॉलसाठी चक्क १७ लाखांची बोली !
पुणे : शहरातील मध्यवस्तीतील (Pune News) वर्तकबाग येथील एका फटाका स्टॉलसाठी ( firecracker) चक्क 17 लाख, तर अन्य एका दुसर्या स्टॉलसाठी 5 लाख 55 हजारांची ऑनलाईन बोली आल्याने चांगलीच गडबड उडाली. महापालिकेच्याय तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा झाल्यास दिवाळी गोड होण्याची चिन्हे आहेत.
मात्र, ऑनलाईन बोली लावताना दोन्ही ठिकाणी एक आकडा चुकून जास्त पडल्याने एवढ्या मोठ्या रक्कमेची बोली लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर ती रद्द करण्यासाठी संबधितांची चांगलीच धावपळ उडाली.
महापालिकेने यावर्षी फटाका स्टॉलसाठी ऑनलाईन बोली लावून त्यासाठी स्टॉल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू आहे. या ऑनलाईन बोलीमुळे अनेकांची मक्तेदारी संपुष्टात आली असून, पालिकेला अगदी दुप्पटपासून आठपट दर आल्याने आर्थिक फायदा झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.