कोरेगाव-भीमा शौर्य दिनाचा मार्ग हायकोर्टाने केला मोकळा, विजय स्तंभाजवळील ऊस काढण्याचे आदेश !
पुणे : कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima) येथे साजरा होणाऱ्या शौर्य दिनाचा (Shorya diwas) मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. विजय स्तंभ (Vijay Stanmb) परिसरातील ऊस काढून येथील जागा मोकळी करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शौर्य दिनाचे नियोजन करण्यासाठी येथील जागा वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज राज्य शासनाने केला होता. न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली.
येथील जागा शौर्य दिनासाठी वापरण्याबाबत मूळ याचिकाकर्ते मालवदकर यांचा काहीही आक्षेप नाही, असे वरिष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयात स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश देत राज्य शासनाचा अर्ज निकाली काढला.
न्यायालयाचे आदेश
शौर्य दिनासाठी ही जागा वापरता यावी, याकरिता गेली पाच वर्षे शासनाकडून अर्ज केला जात आहे. न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आहे. यावर्षीदेखील परवानगी दिली जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाचे आदेश
- 22 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत राज्य शासन विजय स्तंभाजवळील जागेचा वापर करू शकते.
- 31 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत सर्वसामान्य नागरिक विजय स्तंभ परिसरात जाऊ शकतात.
- येथे उसाची शेती आहे. ऊस काढून येथील जागा मूळ याचिकाकर्ते मालवदकर यांनी मोकळी करावी.
- मालवदकर यांनी ऊस नाही काढल्यास राज्य शासन येथील ऊस काढून जागा मोकळी करू शकते.
- प्रशासनाकडून ऊस काढताना काही नुकसान झाल्यास मालवदकर नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे करू शकत नाहीत.
- राज्य शासनाने काढलेला ऊस नेण्याची परवानगी मालवदकर यांना आहे.
शौर्य दिनासाठी ही जागा वापरता यावी, याकरिता गेली पाच वर्षे शासनाकडून अर्ज केला जात आहे. न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आहे. यावर्षीदेखील परवानगी दिली जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाचे आदेश
- 22 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत राज्य शासन विजय स्तंभाजवळील जागेचा वापर करू शकते.
- 31 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत सर्वसामान्य नागरिक विजय स्तंभ परिसरात जाऊ शकतात.
- येथे उसाची शेती आहे. ऊस काढून येथील जागा मूळ याचिकाकर्ते मालवदकर यांनी मोकळी करावी.
- मालवदकर यांनी ऊस नाही काढल्यास राज्य शासन येथील ऊस काढून जागा मोकळी करू शकते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.