पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी सोमवारपासून संपावर !
आरोग्य सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी 'राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (Under the National Health Mission) (एनएचएम) काम करणारे कंत्राटी कर्मचारी (strike) येत्या सोमवारपासून (६ नोव्हेंबर) काम बंद आंदोलन (Work stoppage movement) करणार आहेत. (Pune News)
जिल्ह्यात 'एनएचएम'अंतर्गत काम करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीने सांगितले.
ओडिशा, मणिपूर, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि मध्य प्रदेशातील सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी 'एनएचएम' कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यासाठी २५ ऑक्टोबरपासून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहा नोव्हेंबरपासून पुण्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे राज्य समन्वयक हर्षल रणवरे यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.