POLITICS: काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची केवळ अफवा !

पुणे: शरद पवारांचं (Sharad Pawar) पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदी बाग (Modi Baug) येथे बुधवारी (दि. १४) आजी-माजी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट

NCP

संग्रहित छायाचित्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या बातम्यांचे खंडन

पुणे: शरद पवारांचं (Sharad Pawar) पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदी बाग (Modi Baug) येथे बुधवारी (दि. १४) आजी-माजी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट (NCP - Sharad Pawar) हा काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. माध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्या येत असतानाच शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात या केवळ अफवा असल्याचे ‘सीविक मिरर’कडे स्पष्ट केले. (NCP Merged in Congress)

अनिल देशमुख म्हणाले,‘‘शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि यापुढेदेखील करत राहू. आजच्या बैठकीत पक्षचिन्ह तसेच आगामी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. आमचा पक्ष काँग्रेस पक्षात विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. या केवळ अफवा आहेत.’’ ‘‘सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला आमचं चिन्ह आणि पक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. शरद पवार हेच आमचा पक्ष आणि चिन्ह. त्यांच्या नावावर आणि विचारधारेवर आम्ही जनतेकडे कौल मागू, आमचा पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन होणणार असल्याच्या चर्चांना काही अर्थ नाही,’’ असा खुलासा  शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केला. 

विधान परिषदेचे माजी आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नवे चिन्ह कोणते घ्यावे याची चर्चा झाली. शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसचे संयुक्त मेळावे घेण्याचे निश्चित झाले. त्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्ष विलिनीकरण या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या आहेत. हा खोटा आणि खोडसाळ प्रकार आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही.’’ (Political News)

आमची मागणी आहे. शरद पवार हेच आमचा पक्ष आणि चिन्ह. त्यांच्या नावावर आणि विचारधारेवर आम्ही जनतेकडे कौल मागू, आमचा पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन होणणार असल्याच्या चर्चांना काही अर्थ नाही,’’ असा खुलासा  शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. विधान परिषदेचे माजी आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नवे चिन्ह कोणते घ्यावे याची चर्चा झाली. शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसचे संयुक्त मेळावे घेण्याचे निश्चित झाले. त्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्ष विलिनीकरण या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या आहेत. हा खोटा आणि खोडसाळ प्रकार आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest