Yerawada Jail : येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन

अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Yerawada Jail : येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन

येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन

पुणे : अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला कारागृह व सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक बी.एन.ढोले आदी उपस्थित होते.

यावेळी बंदी कलाकरांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अभंग व मराठी भावगितांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. बंदीजनांना यावेळी  दिवाळी फराळ देण्यात आला. श्री.गुप्ता यांनी बंदीजनांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले.

मध्यवर्ती कारागृहात अंगणवाडी बगीचा कामाचा शुभारंभ

येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘नन्हे कदम’ बालवाडीची संरक्षक भींत व बगीचा कामाचा शुभारंभ सिबेज कंपनीच्या रितु नथानी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्यासह कारागृहतील इतर अधिकारी, कार्पेडीअम कंपनीच्या मिनौती मरिन आणि सिबेजचे कर्मचारी उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest