संग्रहित छायाचित्र
शिक्षण विभागाने (Department of Education) पुन्हा या शाळांवर कारवाईला सुरूवात केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात संबंधित शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे, याबाबतचे प्रसिद्धी पत्रक हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी नीलिमा म्हेत्रे (Neelima Mhetre)यांनी प्रसिद्ध केले आहे. (Unauthorized schools)
शासनाची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे शाळा सुरू करून शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या हवेली तालुक्यातील १५ शाळांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात नामांकित शाळांचा समावेश असून या शाळांनी शिक्षण हक्क कायदा व स्वयंअर्थसाहित कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा ठपका शिक्षण विभागाने ठेवला आहे.
अनधिकृत शाळांची यादी
1) नारायणा ई. टेक्नो स्कूल वाघोली ता. हवेली
2) सुलोचनाताई झेंडे सेमी इंग्लीश स्कुल, कुंजीरवाडी ता हवेली.
3) न्यु विजडम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटय, ता. हवेली जि. पुणे
4) मारी गोल्ड इंटरनॅशनल स्कूल, कदमवस्ती, सोलापूर रोड ता. हवेली.
5) द टायग्रीस इंटरनॅशनल स्कूल, कदमवस्ती सोलापूर रोड, ता. हवेली. 7
6) रामदरा सीटी स्कूल, लोणीकाळभोर
7) स्मार्ट किड्स इंग्लिश स्कूल, आव्हाळवाडी, वाघोली
8) विठ्ठल तुपे ई-लर्निंग स्कूल पिंपरीसांडस ता.हवेली.
9) रिव्हरस्टोन इंटरनॅशनल स्कूल, पेरणे, ता. हवेली
10) ग्यानम ग्लोबल स्कूल सर्व्हे नं. 27015 उरुळी देवाची ता. हवेली.
(11) कल्पवृक्ष इंग्लिश स्कूल, किरकटवाडी ता. हवेली
12) क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हेवाडी,खडकवासला ना. हवेली
13) पुणे इंटरनॅशनल स्कूल, अष्टापुर मळा लोणीकाळभोर
14) छत्रभुज नरसी स्कूल, अमनोरा पार्क टाऊन, साडेसतरानळी. सस् ता हवेली.
15) विबग्योर स्कुल केसनंद, जा. हवेली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.