अवलियाने तयार केली आगळीवेगळी फर्स्ट एड बॉक्स लग्नपत्रिका !
पुणे : आपण अनेक प्रकारचे लग्न पत्रिका (Marriage card) पाहिले असेल मात्र ही अनोखी मेडिकल पत्रिका चर्चेचा विषय बनली आहे. सामूहिक विवाह, चाय पे शादी, खजूर पे शादी, आसान निकाह, मुलगी बघायला गेले आणि लग्न लावून कुटुंबाचे लोक परत आले, यासारखे असे अनेक उदाहरण आपण पाहिले असेल.(Pune News)
पुणे कोंढवा भागातील सामाजिक कार्यकर्ते इंतखाब फरास हे स्वतः मॅरेज ब्युरो चालवतात व शेकडो मुली मुलांचे लग्न त्यांनी आजपर्यंत लावून दिलेले आहे. ही समाजसेवा पूर्णपणे ते फ्री मध्ये करतात. त्यांच्या मुलाचा लग्न 14/11/2023 रोजी सोलापूर या ठिकाणी आहे. वडील व मुलगा कोंढवा पुण्यातच राहतात. काल माझी एका हॉटेलमध्ये फरास सर यांची भेट झाली असता त्यांनी त्याच्या मुलाचा लग्न पत्रिका मला दिली.
या फर्स्ट एड बॉक्समध्ये इलेक्ट्रॉल पावडर, कॉटन, कॉटन बँडेज, बँडेड, ऍसिडिटीचा औषध, पेन किलर, डेटॉल, जखमेचा क्रीम, जीरा, कलौंजी, सब्जा बीज इत्यादी वस्तू त्या बॉक्समध्ये आहे.