शिवाजीनगर परिसरातील १३ हॉटेलवर कारवाई, पुन्हा अतिक्रमण केल्यास दाखल होणार गुन्हा !
पुणे : महापालिकेच्या बांधकाम (PMC News) विभागाच्यावतीने शिवाजीनगर परिसरातील आपटे रास्ता, (Apte Rasta) घोले रस्ता, देशमुख पथ येथे जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये १३ हाॅटेलवर कारवाई करून फ्रंट (Pune News) मार्जिन, रेअर मार्जिन, साईड मार्जिनवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये नऊ हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
यामध्ये एका हॉटेलच्या ५ हजार ८०० चौरस फुटचा समावेश आहे. या कारवाईमध्ये बांबू, पत्रा, लोखंडी अँगल, ओनिग ई चे सहाय्याने बांधलेल्या शेड, ई. चा समावेश आहे. यानंतर पुन्हा विनापरवाना शेड उभारल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुनिल कदम यांनी दिला आहे.
कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, यांचे मार्गदर्शन खाली उपअभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी, एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील १० बिगारी, एक पोलिस गट ई च्या सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.