द रायझिंग स्टार शाळेच्या स्कुल बसला अपघात; अपघाताचा थरार समोर...
पुणे : पुण्यातील वाघोली येथे रायझिंग स्टारRising Star School) या शाळेच्या स्कूल बसला अपघात झाला. भरधाव वेगातील ही बस झाडाला जाऊन आदळली. यावेळी बस विद्यार्थ्यांनी भरलेली होती. या अपघातामध्ये शाळेचे चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (School Bus Accident)
View this post on Instagram
बस भरधाव वेगात झाडाला जाऊन आदल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. चालकाने वेगात ही बस चालवल्याचे निष्पन्न झाले आहे. या निमित्तान शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, पालकांनी या हलगर्जीपणा विरोधात संताप व्यक्त केला असून चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.