उड्डाणपुलासाठी विश्रांतवाडी चौकातील स्काय वॉकचे स्थलांतर !
पुणे-आळंदी रस्त्यावरील (Pune-Alandi road) विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडी (Traffic )कायमस्वरुपी सोडविण्यासाठी नवीन उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरची उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथे लाखो रुपये खर्चून पादचार्यांसाठी उभारलेल्या स्काय वॉकचे (Sky Walk) स्थलांतर जवळच असलेल्या प्रतीकनगर चौकात करण्यात येणार आहे.(Pune News)
तसेच लोखंडी सांगाडा शिवाजीनगर येथील रस्त्यावर वापरण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वी पादचार्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी स्काय वॉक उभारण्यात आला होता. मात्र, रस्ता ओलांडण्यासाठी लागणारा वेळ, अनेकदा चालू नसलेली लिफ्ट आदी कारणांमुळे पदाचार्यांकडून क्वचितच 'स्काय वॉक'चा वापर होत होता. धानोरी, लोहगाव, विद्यानगर, पुणे-आळंदी रस्ता व विमानतळ रस्त्यावरील रहदारीची समस्या सोडविण्यासाठी लवकरच या चौकात ग्रेडसेपरेटर व उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे येथील स्काय वॉक काढून टाकावा लागणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.