ST bus : पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस बंदच, प्रवाशांचे अतोनात हाल

मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काही (ST Bus) जिल्ह्यांमध्ये हिंसक वळण लागले आहे. त्यात मराठवाडा आणि सोलापूरच्या (Pune News) काही भागांत बससेवर दगडफेक करण्यात आली.

ST bus : पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस बंदच, प्रवाशांचे अतोनात हाल

संग्रहित छायाचित्र

खासगी बस चालकांकडून आर्थिक लूट

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काही (ST Bus) जिल्ह्यांमध्ये हिंसक वळण लागले आहे. त्यात मराठवाडा आणि सोलापूरच्या (Pune News) काही भागांत बससेवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शिवाजीनगर आगारातून तीन दिवसांपासून मराठवाड्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंदच आहे. परिणामी प्रवाश्यांचे अतोनात हाल होत असून याचा गैरफायदा खासगी बस कंपन्यांकडून घेतला आहे. एरवी 500 रुपयांच्या तिकीटांसाठी 2 हजार रुपये वसूल केले जात आहे. त्यामुळे एसटीला जवळपास 80 लाखांचा फटका बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीड, परभणी, पंढरपूर व इतरही भागांत एसटी बस जाळण्यात आल्या तसेच तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सुरुवातीला पुण्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नादेड, परभणी, लातूर, धाराशिव येथील बससेवा बंद करण्यात आली आहे.

परंतु, आंदोलनाची तीव्रता वाढल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी पुण्यातील दोन्ही आगार आणि पुणे विभागातील इतर आगारांतील एसटीची सेवा काही प्रमाणात बंद करण्यात आली. यामुळे गावी जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले. प्रमुख मार्गांवरील बससेवा बुधवारीही बंद केल्याने एसटीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांत रद्द केलेल्या 1600 फेर्‍यांमुळे पुणे विभागाला जवळपास 80 लाखांचा तोटा झाला आहे.

पुण्यातील शिवाजीनगरातून नाशिक मार्गावर बससेवा सुरू आहे. तर इतर मार्गांवरील सेवा बंद आहेत. तर स्वारगेट आगारातून सोलापूर, सांगली, पंढरपूर व कर्नाटक राज्यात जाणारी एसटी सेवा बंद करण्यात आली. सध्या स्वारगेट आगारातून मुंबई आणि कोकण मार्गावर बस सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तीन दिवसांत 1600 फेर्‍या रद्द

पुण्यातील शिवाजीनगर आगारातून मराठवाडा व विदर्भात ये-जा करणार्‍या, तर स्वारगेट आगारातून सोलापूर, सांगली, पंढरपूर व इतर मार्गांवरील फेर्‍या तीन दिवसांपासून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे विभागातून तीन दिवसांत जवळपास एकूण 1600 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest