संग्रहित छायाचित्र
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हिवाळी सत्रातील परिक्षेसंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार हिवाळी सत्र परीक्षा दिवाळीनंतर आयोजित केल्या जाणार आहेत. या निर्णयानुसार सर्व विद्याशाखेतील पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपारिक अभ्यासक्रमांसह विधी पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत विद्यापीठाने हा निर्णय दिला आहे.
कमीतकमी कालावधीत पूर्ण केलेला अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान पाहता सर्वच स्तरातून हिवाळी सत्रातील परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. 'संलग्न महाविद्यालयांतील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील हिवाळी सत्राच्या परीक्षा येत्या २१ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.