Meera Chadha Borwankar : पुण्यातील कार्यक्रमाचे अजित पवारांच्या दबावामुळे निमंत्रण रद्द : मिरा बोरवणकर

'मॅडम कमिशनर' (Madam Commissioner) या पुस्तकाच्या वाचनाचा 26 नोव्हेंबरला कार्यक्रम होता, त्याचे अधिकृत निमंत्रण होते, पण तो कार्यक्रमच रद्द केल्याचे संयोजकांनी कळवले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दबावामुळेच हे निमंत्रण रद्द केल्याचा आरोप

Meeran Chadha - Borwankar

पुण्यातील कार्यक्रमाचे अजित पवारांच्या दबावामुळे निमंत्रण रद्द : मिरा बोरवणकर

पुणे : 'मॅडम कमिशनर' (madam commissioner) या पुस्तकाच्या वाचनाचा 26 नोव्हेंबरला कार्यक्रम होता, त्याचे अधिकृत निमंत्रण होते, पण तो कार्यक्रमच रद्द केल्याचे संयोजकांनी कळवले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दबावामुळेच हे निमंत्रण रद्द केल्याचा आरोप माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी मिरा चढ्ढा - बोरवणकर (Meera Chadha Borwankar) यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात अजित पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. आता पवार यांच्या दबावामुळेच पुण्यातील कार्यक्रमाचे निमंत्रण रद्द केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या, मला 26 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण दिले होते. पण तीन-चार दिवसांनी आयोजकांनी मला फोन केला. त्यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित हे सगळे प्रकरण झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला कार्यक्रम घेता येणार नाही, असे सांगितले. हे ऐकून मला एकदम धक्का बसला. पण राजकीय नेत्यांबद्दल बोलल्यामुळे असे काही तरी होणार हे लक्षात आले, असे बोरवणकर म्हणाल्या.

ज्यांनी मला विमानाचे तिकीट पाठवले होते आणि माझा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात आले. ते पुन्हा एकदा स्पष्ट करायला सांगितले आहे. त्यावर संबंधितांनी, तुमचे सेशन ओव्हरलॅप होतेय, त्यामुळे ते रद्द केले आहे.  विमान तिकीटही रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांना अधिकारी घाबरतात. त्याचाच हा परिणाम असेल, असे बोरवणकर म्हणाल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest