Sassoon Hospitals : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमधे 6 जण अडकले अन्... प्रशासनाची उडाली धावपळ !

ससून सर्वोपचार रुग्णालयात (Sassoon Hospitals) चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट (Elevator) अडकल्याची घटना घडली. या घटनेत पाच पुरुष आणि एक महिला असे मिळून सहाजण लिफ्ट मध्ये अडकले होते. अग्निशमन दलाकडून अडकलेल्या सहा जणांचे सुखरूप सुटका करण्यात आली.

Sassoon Hospitals

ससून रुग्णालयाच्या लिफ्टमधे 6 जण अडकले अन्... प्रशासनाची उडाली धावपळ !

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात (Sassoon Hospitals) चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट (Elevator) अडकल्याची घटना घडली. या घटनेत पाच पुरुष आणि एक महिला असे मिळून सहाजण लिफ्ट मध्ये अडकले होते. अग्निशमन दलाकडून अडकलेल्या सहा जणांचे सुखरूप सुटका करण्यात आली. (Pune News)

दरम्यान नागरिक लिफ्टमध्ये अडकल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. अग्निशामक दलाचे जवान, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या अथक परिश्रमानंतर सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले.

लिफ्ट बंद पडण्याचे सत्र सुरूच
या अगोदर देखील अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसापूर्वीच महापालिकेच्या लिफ्टमध्ये कर्मचारी अडकल्याने प्रशासनची धावपळ उडाली होती. तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अडकून पडले होते. तसेच त्याआधी कमला नेहरू हॉस्पिटल मधील लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांची हेळसांड झाली होती. आता या घटनेमुळे पालिकेच्या लिफ्टचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest