Accident News: पुणे-यावल एसटी बसला अजिंठानजीक अपघात

पुणे: मागील काही काळापासून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बसला अपघात होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण

Accident News

Accident News: पुणे-यावल एसटी बसला अजिंठानजीक अपघात

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अजिंठा: मागील काही काळापासून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बसला अपघात होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. (Accident News)

दरम्यान, पुणे-यावल बसला अजिंठा नजीक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याचे वृत्त आहे.

आज सकाळी पुण्याहून यावलसाठी निघालेल्या बसला (एमएच ४० वायवाय- ६१९१) ला आज अजिंठा गावाजवळ अपघात झाला. एका तरूणीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला नेली. येथे असलेल्या खड्डयात बस लटकली. यामुळे बसमधील चार-पाच प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळतच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन प्रवाशांना बसमधून काढण्यासाठी मदत केली. सोयगाव आगाराच्या कर्मचार्‍यांनी देखील घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. सदर बस ही यावल आगाराची असल्याचे वृत्त आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest