MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उप निरीक्षक पदासाठीची विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा पुढे ढकलली !

स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यास आणि पूर्वतयारी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पोलीस उप निरीक्षक (Sub Inspector of Police exam) पदासाठीची विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.

MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उप निरीक्षक पदासाठीची विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा पुढे ढकलली !

पुणे : स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यास आणि पूर्वतयारी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पोलीस उप निरीक्षक (Sub Inspector of Police exam) पदासाठीची विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा शनिवार, दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्यात येणार होती. परंतु प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परिक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच रविवार, दिनांक १० डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात येईल, असे आयोगाकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. उपसचिवांनी या संदर्भातील शुद्धिपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest