साखळी उपोषणात विविध वेशभूषांच्या सादरीकरणातून कलाकारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

भारूड, जादूगार, एकपात्री, बॅकस्टेज, लाईट, साऊंड, वादक, गायक, शाहिर, भीमशाहिर, वेबसिरिज अशा विविध क्षेत्रातील अनेक लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाला पाठींबा दर्शविला.

साखळी उपोषणात विविध वेशभूषांच्या सादरीकरणातून कलाकारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

साखळी उपोषणात विविध वेशभूषांच्या सादरीकरणातून कलाकारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील सर्वच कलाकार, चित्रपट, मालिका, लोकधारा, ऑर्केस्ट्रा लावणी, नाटक, कीर्तन, तमाशा, लोकनाट्य, प्रवचन, भारूड, जादूगार, एकपात्री, बॅकस्टेज, लाईट, साऊंड, वादक, गायक, शाहिर, भीमशाहिर, वेबसिरिज अशा विविध क्षेत्रातील अनेक लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाला पाठींबा दर्शविला. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठींबा देण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, बालगंधर्व परिवार पुणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो कलाकारांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.

गेली अनेक वर्षे मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न सुटला जात नाही, हा आरक्षणाचा ज्वलंत विषय लवकरात लवकर मार्गी लावून समस्त मराठा समाजाला न्याय मिळावा या साठी पुणे शहरातील हजारो कलाकार साखळी उपोषणाला बसले आहेत. या उपोषणात मेघराजराजे भोसले, प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा, अनिल आण्णा गुंजाळ, पराग चौधरी, लावणी सम्राज्ञी वर्षाताई संगमनेरकर, अरूण गायकवाड, शशिकांत कोठावळे, चित्रसेन भवार, ॲड.मंदारभाऊ जोशी, अशोक जाधव, मिठू पवार, योगेश देशमुख, वनमाला बागूल, लावणी सम्राज्ञी हेमा कोरबरी, स्वाती धोकटे, आरोही पाटील, माधवी सातपुते, जादूगार रघुराज, प्रमोद रणनवरे, दिग्दर्शक शरद गोरे, प्रकाश झेंडे, कुणाल निंबाळकर, अजित शिरोळे, साईनाथ जावळकर, सचिन फूलपगार, नितीन मोरे, सागर राजे बोदगीरे, हेमंत महाडीक, योगेश जोशी, महेश कदम, मनोज माझिरे, गणेश गायकवाड, लावणी साम्राज्ञी संगीता लाखे, लावणी सम्राज्ञी अर्चना जावळेकर, दिपा माथफोड, शितल चोपडे, किरण खेंगरे, दत्ता गाडेकर, दिग्दर्शक उमेश जगताप, असे कलाक्षेत्रातील शकडो कलाकार दिवसभर चाललेल्या या साखळी उपोषणात सहभागी झाले होते. गायक चित्रसेन भवार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा गीते सादर केली.

समस्त कलाक्षेत्राचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे कलाकारांनी आवर्जून सांगितले. हा लढा केवळ मनोज जरांगे पाटील यांचाच नाही तर तो संपूर्ण कलाकारांचा असल्याचे या वेळी मेघराज राजे भोसले म्हणाले. या साखळी उपोषणात विविध वेशभूषा करून कलाकारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest