Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याची माहिती मिळत आहे. ही माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे.

Eknath Khadse

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याची माहिती मिळत आहे. ही माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुत्रे हलवली आहेत.

दुपारी १ च्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखत होते. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजतंय. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे. 

दुपारच्या सुमारास एकनाथ खडसे यांना छातीमध्ये दुखू लागलं होतं. त्यामुळे त्यांना जळगावातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest