Bhidewada : हस्तांतर केले नाही तर भिडेवाड्याच्या जागेचं सक्तीनं भूसंपादन ! पुणे महापालिका ॲक्शन मोडवर

भिडेवाड्याची जागा हस्तांतरीत करण्यासाठी जागा मालकांना पुणे महापालिकेकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत जागा ताब्यात न दिल्यास सक्तीनं भूसंपादन करण्यात येणार आहे.

Bhidewada : हस्तांतर केले नाही तर भिडेवाड्याच्या जागेचं सक्तीनं भूसंपादन ! पुणे महापालिका ॲक्शन मोडवर

हस्तांतर केले नाही तर भिडेवाड्याच्या जागेचं सक्तीनं भूसंपादन ! पुणे महापालिका ॲक्शन मोडवर

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. भिडेवाड्याची (Bhidewada) जागा हस्तांतरीत करण्यासाठी जागा मालकांना पुणे (PMC) महापालिकेकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत जागा ताब्यात (Pune News) न दिल्यास सक्तीनं भूसंपादन करण्यात येणार आहे.

याच वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. आता या जागेवर राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी जागा ताब्यात घेण्याकरता उच्च न्यायालयानं मान्यता दिल्यानंतर महापालिका आणि जिल्हा प्रशासनानं कामाला सुरुवात केली आहे. भिडेवाड्याची जागा ताब्यात देण्यासाठी जागा मालकांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जागा ताब्यात न मिळाल्यास सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे. दरम्यान जागा मालकंकडून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.

भिडेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. या जागेवर आता राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागेचं भूसंपादन करण्यात येत आहे. स्मारकासाठीचा आराखडा अंतिम करण्याचं काम सुरू आहे. जागा ताब्यात आल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest