Pune Metro : पुणे मेट्रोसाठी केंद्राकडून पीएमआरडीएला 410 कोटींचा निधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) (PMRDA) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाला (Pune Metro) केंद्र सरकारकडून 410 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

Pune Metro

पुणे मेट्रोसाठी केंद्राकडून पीएमआरडीएला 410 कोटींचा निधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) (PMRDA) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाला (Pune Metro) केंद्र सरकारकडून 410 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प 23 किलोमीटर लांबीचा आहे.या मेट्रो मार्गावर एकूण 23 स्टेशन असणार आहेत.

या मेट्रो प्रकल्पाचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा 8 हजार 313 एवढा आहे. या प्रकल्पासाठी पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी देखील स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान सरकारकडून त्यांच्या हिस्यापोटी 1 हजार 225 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यापैकी 410 कोटींचा निधी नुकताच पीएमआरडीएला प्राप्त झाला आहे.

हा निधी मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागकडे पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आणि प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यास अखेर यश आले असून पीएमआरडीएला केंद्र सरकारकडून 410 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

सर्वेक्षणाच्या अहवालानुसार या मेट्रो मार्गाच्या परिसरात 14 लाख नागरिक दररोज प्रवास करतात. या मार्गिकेमुळे प्रवाशांना शिवाजीनगर आणि सिव्हील कोर्ट येथे मार्गिका बदलून महामेट्रोद्वारे शहराच्या इतर भागात जाता येईल. हिंजवडी ते शिवाजीनग‍र प्रवासाचा एकूण वेळ केवळ 35 मिनिटे असल्याने नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होऊ शकेल. आतापर्यंत या प्रकल्पाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए म्हणाले, "केंद्र सरकारकडून 410 कोटींचा निधी मिळाल्याने या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाची गती वाढणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल, अशा विश्वास आहे."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest